Our Published Books on the Shelf
book1 बुद्ध एक हिंदू होते?
लेखक : डॉ. सुरेंद्र अज्ञात
विष्णुच्या नवव्या अवताराला लेखकाने दिलेले समर्पक उत्तर. Was Buddha a Hindu? या छोट्याशा पुस्तिकेचा मराठी अनुवाद.

हार्ड कॉपी : 15 रु.

book1 बुद्धाचा मूळ सिद्धांत
लेखक : महापंडित राहुल सांकृत्यायन
अनुवाद : राजरत्न ठोसर
"बुद्ध के मूल सिद्धांत" या हिंदी पुस्तिकेचा मराठी अनुवाद.

हार्ड कॉपी : 15 रु.

book1 वारणेचा वाघ
लेखक : अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी, 1987 नंतर प्रथमच प्रकाशित.

हार्ड कॉपी : 100 रु.

book1 माझा भाऊ अण्णाभाऊ
लेखक : शंकर भाऊ साठे
अण्णाभाऊ साठे यांचे बंधु शंकर भाऊ साठे यांनी लिहिलेले अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र


हार्ड कॉपी: 100 रु.
book2 फकिरा
लेखक : अण्णा भाऊ साठे
राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन गौरविलेली कादंबरी "फकिरा." अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस ती अर्पण केलेली आहे.

हार्ड कॉपी : 100 रु.

book4 राज्यघटनेवर डाका
लेखक : एल.आर. बाली
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ लेखक एल.आर. बाली यांच्या "संविधान पर डाका" या पुस्तकाचा मराठी अनुवाद. राज्यघटनेचा सरकारने कसा दुरुपयोग केलेला आहे हे एल. आर. बाली यांनी अतिशय संशोधनपूर्वक यात सांगितलेले आहे.

हार्ड कॉपी : 50 रु.
book3 आत्मबळ
लेखक : डॉ. किशोर शांताबाई काळे
"कोल्हाट्याचं पोर" या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांनी तरुणांना सांगितलेला संदेश. आत्मविश्वास कसा वाढवायचा याचे सुंदर वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेले आहे.

हार्ड कॉपी : 20 रु.
book4 जातीप्रथेचे विध्वंसन
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
डॉ. आंबेडकर यांनी जात-पात-तोडक मंडळासाठी लिहिलेले भाषण, परंतु हे भाषण वादग्रस्त वाटल्याने आयोजकांनी संमेलनच रद्द केले. पुढे डॉ. आंबेडकरांनी हे भाषण स्वतःच प्रकाशित केले. Annihilation of Caste या मूळ इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद.

हार्ड कॉपी : 70 रु.
book7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकलित वाड्मय
संपादक : बी.जी. कुंटे अनुवाद : कर्नल श्री.का. खाजगीवाले
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या Source Material on "Dr. Babasaheb Ambedkar and the movement of Untouchables" या खंडाचे संपूर्ण मराठी भाषांतर आहे. या खंडाचे मूळ साहित्य मा. पोलीस कमिशनर, मुंबई यांच्या दफ्तरातून संकलित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पोलीस अहवालाव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्याशी व त्यांनी सुरु केलेल्या अस्पृश्यांच्या चळवळीशी निगडीत वर्तमानपत्रातील मजकूर यात समाविष्ट केलेला आहे. वृत्तपत्रातील मजकूर मुख्यत द बॉम्बे क्रॉनिकल आणि द टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तत्रातून घेतलेला आहे. तसेच पोलीस स्टेशन डायरीतील टिप्पणी आहेत. बॉम्बे सिक्रेट अब्सटर्स गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच C.I.D. चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळीसंबंधी गोपनीय उतारे आहेत.

हार्ड कॉपी : 450 रु.
book9 महार आणि त्यांचे वतन
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "महार आणि त्यांचे वतन" या विषयावर बहिष्कृत भारत या त्यांच्या वृत्तपत्रात चालविलेली लेखमाला आहे.

 
downloadbooks
----------------------------------------
rajratna thosar
About
Rajratna Thosar
----------------------------------------
Free Books Downlaod
FreeBook1
FreeBook2