Our Published Books on the Shelf
book1 महाराष्ट्र एक भाषावार प्रांत
लेखकः डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवादः अंजली जोशी
१९४८ साली भाषावार प्रांतरचना आयोगासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले गेलेले निवेदन यातील काही मुद्दे- मुंबई संदर्भातील मदभेद, मुंबई आणि मराठा साम्राज्य, गुजराती लोक मुंबईचे रहिवाशी आहेत का?, मुंबई भारताची व्यापारपेठ, महामुंबई मागील हेतु इत्यादी.

हार्ड कॉपी : 20 रु.

book1 भारतातील लहान स्थावर मालमत्ता आणि त्यांच्यावरील उपाययोजना (Small Holding in India and their Remedies)
लेखकः डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवादः अंजली जोशी
मुंबई कौन्सिलच्या आधीच्या अधिवेशनात डॉ. आंबेडकरांनी छोट्या शेतक-यांच्या हिताची बाजू लढविली होती. त्यावेळी छोट्या शेतक-यांची बाजू घेणारी कोणतीही संघटना नव्हती. बाबासाहेबांनी कायदे कौन्सिलच्या आखाड्यात घेतलेल्या भूमिकेमुळे छोट्या शेतक-यांचा प्रश्न अधिक तीव्रतेने भासू लागला.

हार्ड कॉपी : 30 रु.

book1 माझी आत्मकथा
संपादक : ज. गो. संत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र, 43 दुर्मिळ छायाचित्रांसहित. पुस्तक वाचताना असे वाटते की बाबासाहेबच स्वतः आपल्याशी बोलत आहेत. तसेच लहान मुलांसाठी टॉनिक सारखे आहे. थोरांना प्रेरणा देणारे पुस्तक. सर्वांच्या संग्रही असावे असे पुस्तक. बाबासाहेबांचा शेवटचा संदेश, "मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून विरोधकांशी लढून मिळविले आहे. महतप्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहका-यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल, तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना संदेश आहे."

हार्ड कॉपी : 120 रु.

book1 रुपयाचा प्रश्न : त्याचा उदगम व उपाय
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
रुपयाचा प्रश्न म्हणजे त्याची किंमत स्थिर करण्याचा प्रश्न. रुपयाची किंमत स्थिर तर बाजारभावाच्या किमती स्थिर. रुपयाची किंमत स्थिर नसेल तर महागाई वाढणार. मग रुपयाचा प्रश्न या प्रबंधात नेमके आहे तरी काय? त्यामध्ये त्यांचे कोणते सिद्धांत आहेत? भीमरावांच्या या सिद्धांतापूर्वी जगप्रसिद्ध अर्थतज्ञांनी रुपयाच्या चलनाबाबत कोणते सिद्धांत सांगितले आहेत? भीमरावांच्या व त्यांच्या सिद्धांतात नेमका कोणता फरक होता? मग या दोघांच्या निष्कर्षांची गल्लत नेमकी कुठे होत होती? भीमरावांचे कोणते सिद्धांत लंडन युनिव्हर्सिटीतील तज्ञांना वादग्रस्त वाटत होते? आणि का? इ. प्रश्नांची सर्वसाधारण उकल करणे जरुरीचे आहे. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली तरी अजूनही रुपयाची किंमत स्थिर करण्यात आलेली नाही, त्यामुळेच महागाई बोकाळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिभावंत अर्थतज्ञ होते हे सिद्ध करणारा हा ग्रंथ.


हार्ड कॉपी: 300 रु.
book2 बुद्ध आणि त्याचा धम्म
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
अनुवादक : घनःशाम तळवटकर, प्रा. म. भि. चिटणीस, शां. शं. रेगे
पुनरीक्षक : कर्नल श्री.का. खाजगीवाले, वंदना अत्रे
तळटिपा : राजरत्न ठोसर
प्रस्तावना अनुवाद : य.दि. फडके
मूळ प्रस्तावना : विजय सुरवाडे यांच्या संग्रहातून
"बौद्ध धर्म तीन सिद्धांताची दीक्षा देतो. प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्मच जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की, एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल." - डॉ. बी. आर. आंबेडकर
या ग्रंथाची वैशिष्टै :
1. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील गौतम बुद्धाचे छायाचित्र
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक ओरिजल छायाचित्र
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या ग्रंथाची मूळ प्रस्तावना ५६ वर्षानंतर प्रथमच या पुस्तकात प्रकाशित
4. दुर्मिळ प्रस्तावनेची टाईप केलेली दोन पाने
5. वाचक व अभ्यासकांच्या सोयीसाठी मूळ प्रस्तावना इंग्रजी व मराठीमध्ये भाषांतर
6. तळटिपा प्रथमच प्रकाशित
7. ग्रंथाची दर्जेदार व टिकाऊ बांधणी
8. ग्रंथाचे आकर्षक कव्हर व उत्कृष्ट छपाई

हार्ड कॉपी : 300 रु.

book4 रमाई (कादंबरी)
लेखक : बंधु माधव
रमाईचे मोठेपण तिच्या पतीभक्तित पतीनिष्ठेत व पतीसेवेत सामावले आहे. साध्वी रमाईला संन्याशी होऊ घातलेल्या आपल्या पतीला, कर्तव्यनिष्ठ बनवण्यासाठी तिला तितकेच कर्तव्यकठोर बनावे लागले आहे. रमाई म्हणजे कठोर कर्तव्य निष्ठेचे मूर्तीमंत प्रतिक. तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतूनच भारत देशात ललामभूत असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा दैदीप्यमान सूर्य प्रकटला. रमाईच्यासारखी निस्वार्थी माणसं स्वतः अंधारात राहातात. प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचं नाव फारच कमी झळकतं. पण त्यांचे सारे जीवन उदात्तेने, त्यागाने भरलेले असते. आजच्या आधुनिक युगातील स्री-मुक्ति चळवळीला रमाईची ही पवित्रगाथा अधिक स्फूर्तिदायी, अधिक बोधप्रद व अधिक क्रांती-प्रवण अशीच वाटेल, अधिक क्रांती-प्रवण अशीच ठरेल.

हार्ड कॉपी : 250 रु. (Out of Stock)
book3 प्राचीन भारतीय व्यापार
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
अनुवादक : कर्नल श्री. का. खाजगीवाले
प्राचीन भारतीय व्यापार उदिमाचा इतिहास. भारताचे मध्यपुर्वेतील व्यापारी संबंध, मध्ययुगातील भारताचे व्यापारी संबंध किंवा इस्मालचा विकास आणि पश्चिमी युरोपचा विस्तार, ब्रिटिश राजवट येण्याचा वेळचा भारत. या प्रबंधाची प्रत दर्शवते की, डॉ. आंबेडकर अक्षर आणि लिपीतज्ञ म्हणून नवीन पिढीशी बरोबरी साधतात.

हार्ड कॉपी : 60 रु.
book4 ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
अनुवादक : अंजली जोशीहा डॉ. आंबेडकरांचा अर्थशास्रावरील पहिला प्रबंध. त्यांनी अमेरिकेतील कोलंबीया विद्यापीठाला एम.ए. च्या पदवीसाठी सादर केला होता. या शोधनिबंधात डॉ. आंबेडकरांनी इ.स १७९२ ते १९५८ ह्या कालखंडातील ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थापन या संबंधीच्या धोरणातील बदलांचा आढावा घेतला आहे. हे बदल भारतीय जनतेला कसे अन्यायकारक ठरले, याचे विदारक चित्र बाबासाहेबांनी मांडले आहे.

हार्ड कॉपी : 30 रु.
book7 हिजडा एक मर्द (Only for Adults)
लेखक : किशोर शांताबाई काळे
"माझ्या मते हिजडा सुद्धा माणूस आह. हिजडा समाज मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तो का वाढत आहे? त्याची मूळ, निर्मिती कुठून झाली आहे? ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा मुंबईमधल्या हिजड्यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन राहिलो, दिवसेंदिवस त्यांच्याबरोबर फिरलो. त्यावेळेस ह्या लोकांमध्ये अतोनात भरलेली माणुसकी दिसली. ह्या त्यांच्या माणुसकीला आपुलकी व प्रेमाची किनार समाज व्यवस्थेकडून, सरकारकडून मिळाली तर त्यांचे अनेक प्रश्न सुटतील असं मला वाटतं. नाहीतरी आधुनिकतेच्या नावाखाली अनेक नवतरुण कानात बाळ्या घालून पोरींसारखे लांबलचक केस वाढवून रस्त्यावरुन फिरताना दिसतात, त्यांच्यामध्ये आणि हिजड्यांमध्ये काय फरक करावा हेच कळत नाही." जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे ह्या म्हणीप्रमाणे स्वतः हिजड्यांमध्ये ९ महिने राहून, साडी नेसून, टाळी वाजवून, त्यांचे जीवन अनुभवून लेखकाने सत्य घटनेवर आधारीत ही कादंबरी लिहिली.

हार्ड कॉपी : 115 रु. (Out of Stock)
book9 भारताचे संविधान
शिल्पकार: डॉ. बी.आर. आंबेडकर
(९४ व्या सुधारणेपर्यंत अद्ययावत व दिनांक २६ सप्टेंबर, २००६ पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे) छायाचित्रे : घटना समितीचे कामकाज चालू असताना, घटना समितीचे सदस्य,घटनेचा अंतिम मसुदा सादर करताना २०१३ ची नवीन आवृत्ती, आकर्षक मुखपृष्ठ व उत्कृष्ट बांधणी.

हार्ड कॉपी : 300 रु. (Out of Stock)
 
downloadbooks
----------------------------------------
rajratna thosar
About
Rajratna Thosar
----------------------------------------
Free Books Downlaod
FreeBook1
FreeBook2