Our Forthcoming Books (आगामी प्रकाशने)
डॉ. आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी
लेखक : डॉ. य.दि. फडके
"चुरचुरीत पण उथळ लेखन करणा-या अरुण शौरी या धंदेवाईक पत्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र हनन करणारे एक जाडजूड पुस्तक [Worshiping False gods : Ambedkar and the facts which have been erased] 1996 साली प्रसिद्ध केले. संशोधकाचे सोंग घेऊन डॉ. आंबेडकरांवर खोटेनाटे आरोप करताना शौरींनी केलेल्या लबाड्या या पुस्तकात उघडकीस आणल्या आहेत.
लोकशाही मानणा-याने विचार कलहाला कदापि भिऊ नये. त्याने विचारांचा मुकाबला विचारानेच करावयास हवा. एवढेच नव्हे तर त्याने महापुरुषांविषयी भक्तिभावाने अगर द्वेषभावनेने केलेल्या विकारग्रस्त एकतर्फी लेखनाचे लोकन्यायालयात भरपूर अस्सल पुरावे सादर करुन खंडन करावयास हवे.
महापुरुषांच्या पुतळ्यावर कावळे शिटतात, तेव्हा कावळ्यांनी केलेली घाण काढून मूर्तीची साफसफाई करण्याचे कर्त्यव्य कोणाला तरी पार पाडावेच लागते.
ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
अनुवाद : अंजली जोशी

"'The Evolution of Provincial Finance in British India' हा बाबासाहेबांचा अर्थशास्रीय दुसरा प्रबंध. पीएच.डी. साठी 1917 साली लिहून पूर्ण केला होता आणि पुस्तकरुपाने 1925 साली 'पी.एस.किंग एण्ड सन्स लि. वेस्टमिंस्टर, ग्रेट ब्रिटेन' या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला होता.
हा ग्रंथ बडोद्याचे महाराजा मा. सयाजीराव गायकवाड यांना भीमरावांनी अर्पण केलेला आहे. या विस्तृत ग्रंथात ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळची घटकराज्ये यांच्यातील आर्थिक संबंध १८३३ ते १९२१ या प्रदिर्घ कालखंडामध्ये कसकसे विकसित झाले, त्याची ऐतिहासिक मीमांसा डॉ. आंबेडकरांनी सादर केली आहे. स्वातंत्रोत्तर काळामध्ये नऊ वित्त आयोगांनी केंद्र-राज्य आर्थिक संबंधाची जी पुनर्रचना केली, त्याला डॉ. आंबेडकरांचे मूलग्राही विवेचन पायाभूत ठरले आहे. वित्त आयोगाबद्दल अनेकांना माहिती आहे. परंतु त्याचा मूलाधार हा डॉ. आंबेडकरांचा ग्रंथ आहे, याची माहिती मात्र अनेकांना नाही.
शूद्र पूर्वी कोण होते? आणि ते इंडो आर्यन सोसायटी मध्ये चौथ्या वर्णात कसे आले?
लेखक : डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवाद : वंदना अत्रे

हा ग्रंथ १९४६ साली प्रथम प्रकाशित झाला होता. २७५ पृष्ठसंख्या असलेला हा महान ग्रंथ ठक्कर एण्ड कंपनीने प्रकाशित केला होता. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले यांना पुढील शब्दसुमनांनी समर्पित केला. "आधुनिक भारतातील श्रेष्ठतम शूद्र नेता ज्याने निम्नवर्गीय जातींना त्यांच्यावर हिंदूंमधील उच्चवर्णीय जातींकडून लादण्यात आलेल्या गुलामगिरीची जाणीव करुन दिली आणि ज्याने परकीय सत्तेकडून स्वातंत्र्याप्राप्तीपेक्षा जीवदायी अशा सामाजिक लोकशाहीच्या प्रतिष्ठापनेचा दिव्य संदेश दिला." हिंदू समाजातील चौथा वर्ण "शूद्र" कसा व केव्हा उत्पन्न झाला, हा आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आणि या बाबतीत जगातील समाजशास्रज्ञांची जी मते आहेत ती खरी नाहीत हे दाखविण्यासाठी बाबासाहेबांनी अलोट साधनसामुग्री प्रस्तृत ग्रंथात वापरली आहे. चातुर्वर्ण्यासंबंधी सांगोपांग विचार करणारा ग्रंथ जगात बहुधा हाच आहे.

सामाजिक व धार्मिक प्रश्नांबद्दल ज्यांना आस्था आहे, अशा समजंस माणसांना हा ग्रंथ फार आवडेल.
रसेल आणि समाजाची पुनर्रचना
लेखक : डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवाद : अंजली जोशी

बर्टण्ड रसेल या जागतिक कीर्तीच्या विचारवंतावर डॉ. आंबेडकरांनी 1918 साली लिहिणे अर्थात वयाच्या 27 व्या वर्षी लिहिणे ही घटनाच विस्मयकारक आहे. डॉ. आंबेडकरांनी या समीक्षणपर लेखनात रसेलच्या काही मतांचा पुरस्कार व काही मतांचे खंडन केले आहे. रसेल यांचे युद्धाचे तत्त्वज्ञान आणि मालमत्तेचे परिणाम या दोन बाबींवर डॉ. आंबेडकरांनी आपले मत प्रतिपादन केले आहे. एकंदरीत या परीक्षणाचा आशय अतिशय उच्च दर्जाचा असून परीक्षण कसे लिहावे याचा वास्तुपाठ या परीक्षणावरुन घ्यावा इतके ते आदर्शवत आहे.
डॉ. आंबेडकरांच्या सहवासात
लेखिका : डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर
शब्दांकन, संकलन, संपादन : विजय सुरवाडे

प्रकाशक : तथागत प्रकाशन, देवचंद अंबादे
डॉ. सविता आंबेडकर यांचे आत्मचरित्र. एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माईंची भूमिका म्हणजे यशोधरेचीच नव्हे काय? प्रत्येक महापुरुषाच्या यशस्वी जीवनात त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा असतो असे सार्थपणे म्हटले जाते. डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्रात त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धात रमाबाईंचा सहभाग आणि उत्तरार्धात माईंचा सहभाग, हा त्याच्या पुरावा आहे.
भारतातील लहान शेतजमिनी आणि त्यावरील उपाय
लेखक : डॉ. बी.आर. आंबेडकर
अनुवाद : अंजली जोशी

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला हा लेख म्हणजे भारताच्या शेती प्रश्नावरील अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाचे भाष्य होय. हा लेख 1918 साली जर्नल ऑफ दि इंडियन इकनॉमिक्स सोसयटी' च्या खंड 1 मध्ये प्रकाशित झाला होता. त्या काळात डॉ. आंबेडकरांनी शेतीविषयक उपस्थित केलेले मूलभूत मुद्दे अजूनही अस्तित्वात आहेत. ते अधिक तीव्रतर झाले आहेत. त्यांच्या या लेखातील ताजेपणा आणि विश्लेषणाची व्याप्ती व खोली लक्षात घेता ते सत्तर वर्षापूर्वी जेवढे मार्गदर्शक होते तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा आज अधिक मार्गदर्शक आहेत.
1950 साली विविध राज्यांनी कार्यान्वित केलेले जमीन सुधारणा विषयक कायदे, हा एक महत्त्वाचा बदल होय. 1967-68 च्या दरम्यान शेती क्षेत्रात झालेली 'हरित क्रांती' हा दुसरा बदल होय. तरीपण भारतीय शेतीचा प्रश्न आजही सुटलेला नाही. तो दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा स्थितीत डॉ. आंबेडकरांनी भारतातील लहान शेतजमिनी आणि त्यावरील उपाय लेख या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
अस्पृश्य आणि पैक्स ब्रिटानिका
लेखक : डॉ. बी.आर. आंबेडकर
१९३०-१९३३ च्या दरम्यान डॉ. आंबेडकर लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते त्या वेळेचा हा प्रबंध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदीक्षा (चित्रमय दीक्षा सोहळा)
संकलन, संपादन : विजय सुरवाडे
फोटोग्राफी अल्बम

"An idea needs propagation as much as a plant needs watering. Both will otherwise wither and die."
Dr. B.R. Ambedkar
 
downlaod-book
----------------------------------------
rajratna thosar
About
Rajratna Thosar
----------------------------------------
Free Books Downlaod
FreeBook1
FreeBook2